Sunday, April 25, 2010

भाग २ - सरकारी ढेकण...एकाच नाव सच्चर, दुसऱ्याच रंगनाथ...!!!

(या लेखाच्या शेवटी चिटकवण्यात आलेली सामन्यातला लेख जरुर वाचा)
नुकताच सामना व्रुत्तपत्रात लेख प्रसिद्ध झाला - धर्मनिरपेकक्षतेच्या कल्पनेला सुरुंग. या लेखातुन सच्चर समितीचा अहवाल आणी सरकारकडुन मतांसाठी केले जाणारे धार्मिक लाड यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. माझ्या "सरकारी ढेकण...एकाच नाव सच्चर, दुसऱ्याच रंगनाथ...!!! " या लेखाचा भाग १ हा याच विषयावर आहे.

आज प्रत्येकजण घाम गाळुन, रक्त आटवुन कष्ट करतोय. कमवलेल्या पैश्यातला काही भाग हा राष्ट्राच्या विकासाकरता देतो.  धर्मनिरपेक्ष, भेदभाव न करता, नि:स्वार्थ भावनेने त्या पैश्याचा उपयोग हा देशाच्या विकासाकरता करणे हे सरकाचे प्रथम कर्तव्य. पण आज हेच पैसे फक्त धर्म पाहुन मुस्लिमांकरता वापरले जात आहेत.  हिंदुनी आणी बाकीच्या धर्माच्या लोकांनी धर्मांतर करावे, असे सरकारला यातुन सुचवायचे आहे का? हज यात्रेकरता अनुदान दिले जाते, अमरनाथसाठी पोलिसांच्या लाठ्या. मुस्लिमांना देता मग बाकीच्या धर्माच्या लोकांना पण द्या, असा याचा अर्थ नाही. धर्मनिरपेक्ष रहा व कुणाचेच धार्मिक लाड करु नका.

आज जातीच्या आधारावर आरक्षण आहे, कारण अमुक एका जातीचा म्हनुन त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आलता. स्त्रियांना आरक्षण दिले गेले, कारण स्त्रि म्हणुन समाजाने त्यांना प्रगतीपासुन वंचित ठेवले. पण मुस्लिम म्हनुन, त्यांचा धर्म पाहुन समाजाने त्यांना कधी शिक्षणापासुन, प्रगतीपासुन वंचित ठेवले होते का? आणी जातीच्या आरक्षणात मुस्लिम जातीही समाविष्ठ आहेतच, मग परत वेगळे धार्मिक आरक्षण का? हे सगळे मतांसाठीचे राजकारण आहे. जातींचे राजकारण चालुच होते, आता धर्माचेही चालु झाले. मुस्लिम लोकसंख्या जास्त म्हणुन कोणत्या क्षेत्राला सरकारने विकासापासुन वंचित ठेवले होते का? भिवंडीमध्ये पोलिस स्टेशन बांधु नये म्हणुन दोन हिंदु पोलिसांची निर्घुन हत्या मुस्लिमांनी केली. तरीपण फक्त मुस्लिम क्षेत्राच्या विकासासाठी सरकार खर्च करतेय. सच्चर समितीच्या नावाखाली सरकारने जनतेची बरीच फसवणुक केली आहे, मी फक्त मोजकीच उदाहरणे इथे दिली आहेत.

अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी सरकार एवढ लांगुलचालन करत आहे, मग बहुसंख्यांकाच्या मतांची काळजी सरकारला का नाही? कारण कदाचित सरकार, बहुसंख्याकातले बहुसंख्य हे गाढव आहेत असे मानते. व कदाचित ते योग्यही आहे, कारण गाढवांच सरकार हे गाढवच असणार. ’मला काय त्याचे’! याच भावनेने आज हा दिवस दाखवला आहे. हा लेख, याचा भाग १ पुर्णपणे वाचल्यावर पण आपली ’मला काय त्याचे’ हिच भावाना असेल तर आपला, आपल्या पुढच्या पिढीचा व देशाचा विनाश अटळ आहे!

जय हिंद,
नरेंद्र

सामना २२ एप्रिल २०१० -

No comments:

Post a Comment