Friday, November 5, 2010

मला ’खाऊ’ द्या !!!

दिवसेंदिवस खाऊगिरी वाढतच चाललिये. प्रत्येकजण खायला कसे मिळेल ह्याच शोधात आहे. तुम्ही म्हणाल, मग त्यात चुकीचे काय आहे? मी अन्न खानार्यांविषयी बोलत नाहीये तर पैसे खानार्यांविषयी बोलतोय. भ्रष्टाचाराविषयी बोलतोय.
भारतात तर अश्या ’मला ’खाऊ’ द्या आणी तुम्ही पण खा’ व्रुत्तिच्या लोकांची संख्या वाढतच चाललीये. भ्रष्टाचार हाताबाहेर गेलाय. याच खापर राजकार्ण्यांच्या डोक्यावर फोडल की झाल. हो, राजकारणी लोक, सरकार याला जवाबदार आहे. किती उदाहरण देवु? आज महाराष्ट्रातला ’आदर्श’ घोटाळा, चारा घोटाळा, बोहोर्स घोटाळा, ऑलंपिक घोटाळा. अशी हजारो उदाहरणे आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर या देशात सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने राज्य केले. मग भ्रष्टाचाराची जवाबदारी कॉंग्रेसची. आज भारत जगातला ८७ नंबरचा भ्रष्टाचारी देश झालाय (१ नंबर म्हणजे कमी भ्रष्टाचारी, http://www.nationmaster.com/graph/gov_cor-government-corruption). देशात आज एकही असा पक्ष नाही जो भ्रष्टाचार मुक्त भारत देण्याच्या मुद्द्यावर निवड्णुक लढवतोय. का?
याला जवाबदार आहेत देशाचे नागरीक. गाढवांच सरकार गाढवच. जसे नागरीक तसे सरकार. भ्रष्टाचार संपवण्यास अक्षम (खर तर भ्रष्टाचार पसरवणारे) सरकार इतके वर्ष निवडुन कसे येते? आपल्यासाख्या गाढवांमुळेच ना? म्हणुन याच खर खापर आपण पहिल्यांदा स्वता:च्या डोक्यावर फोडायला हवे.
प्रत्येकजण स्वत:च काम लवकर करून घ्येण्यासाठी, जास्त पैसे मिळवण्यासाठी भ्रष्टाचार वाढवायला हातभार लावतोय. शिक्षण हे आज फक्त माणसाला शिक्षित बनवत आहे, त्याला पैसे कमवाया शिकवत आहे. पण ते माणसाला सुशिक्षित, सुसंस्कारी बनवत नाहीये. मुलाला शाळेत घेण्याकरता सुद्धा शाळा डोनेशन घेतात. ह्या शाळा काय घडवणार आदर्श नागरीक? असल्या शाळेतुन शिकलेले फक्त ’आदर्श’ घोटाळे करु शकतात. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचार बंद करु शकत नसाल तर कायदेशिर तरी करा म्हनुन सरकारचे कान ऊपट्ले आहेत (सामना, बातमी शेवटी चिटकवली आहे).
हे सर्व जर असेच चालु राहिले तर, भारत देश ’महासत्ता’ नाही बनला तरी ’महाभ्रष्टाचारी’ देश नक्कीच बनेल.
भ्रष्टाचार संपण्यासाठी बरेच उपाय आहेत. गरज आहे ती इच्छाशक्तीची. स्वत:पासुन सुरुवात करा. स्वत:पुरते न थांबता, बाकीच्यांनाही सांगा. देशात चांगले सरकार आणण्याकरता प्रयत्न करा. असे बरेच ऊपाय आहेत. देशाला भ्रष्टाचारापासुन वाचवले नाही तर विनाश अटळ आहे.

लक्ष्मीपुजनाच्या मुहुर्तावर लक्ष्मीला एवढच मागण की, तु तुझ्या भ्रष्टाचारी भक्तांना कधीही प्रसन्न होवु नकोस आणी ह्या देशाला, जगाला भ्रष्टाचारापासुन मुक्त कर!!!

वंदे मातरम्‌,
नरेंद्र

(कोणत्याही खादाड्खाऊ गाढवाच्या जर ’आदर्श’ भावना ह्या लेखाने दुखवल्या असतील तर त्याची जवाबदारी त्याने स्वत: घ्यावी व पुन्हा ’खाऊ’गिरी करु नये.)