तिसरया शतकात, रोमच्या राजाने (Roman Emperor Claudius II) सैनिकांना लग्न करायला बंदी केली. कारण त्याचं सैन्य त्यामुळे शक्तिशाली राहील अस त्याला वाटायचं. "व्हेलेण्टाईन" नावाचा ख्रिश्चन धर्मोपदेशक त्या सैनिकांची गुपचुप लग्न लावायचा. राजाने त्याला जेलमधे टाकलं. धर्मांतर केलंस तर जिवंत राहशील नाहितर तुला मारलं जाईल, अस त्याला सांगितल गेलं. पण त्याने धर्मांतर करायला नकार दिला.
अस मानतात की व्हेलेण्टाईनने जेलरच्या आंधळ्या मुलीला बरं केलं आणि मरायच्या आधी त्याने तिला पत्र लिहिलं आणि पत्राच्या शेवटी, "तुझा व्हेलेण्टाईन" ("From your Valentine") अशी सही केली. इतिहासात कुठेच असा पुरावा नाही की त्यांच खरं प्रेम होतं.
त्याला १४ फेब्रुवारी २६९ इ.स. ला मारण्यात आलं. धर्माकरता त्याने स्वत:चा जीव दिला. इ.स. ४९६ ला मुख्य ख्रिश्चन धर्मगुरु जेलासिअस (Pope Gelasius) ने, व्हेलेण्टाईनच्या आठवणीत हा दिवस साजरा करायचं ठरवलं. आज हाच दिवस प्रेमाचा दिवस म्हणुन साजरा होतो!
भारतीयांचा ह्याच्याशी काडीचाही संबंध दिसत नाही. पण आता ह्या दिवसाला प्रेमाचा दिवस म्हणुन वलय निर्माण झालंय अथवा केलं गेलंय आणि प्रेमाशी तर सगळ्यांचाच संबंध येतो!
जर साजरा करायचा असेल तर, हा दिवस का व कशासाठी साजरा करायचा ते आधी समजुन घ्या. खरच काही प्रेमाचा इतिहास आहे का? का उगाच दुसरा करतोय म्हणुन आपण पण तेच करायचं? काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. पण आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा.
व्हेलेण्टाईन डे आपण जर साजरा करतो तर ज्यांचा आपल्या देशाशी संबंध आहे, आपल्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, ज्यांचा आपल्या असण्याशीच संबंध आहे, ज्यांच्यामुळे आज आपण सुखाने, ताठ मानेने जगु शकतोय, त्यांचे दिवसही आपण न विसरता साजरे करतो का? असे दिवस तरी माहीत आहेत का? त्या दिवसांच महत्व हे व्हेलेण्टाईन डे पेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. असे दिवस प्रत्येकाने न विसरता साजरे करावेत.
काही मह्त्वाचे दिवस -
१. १५ ऑगस्ट - भारत स्वतंत्रता दिवस
२. २६ जानेवारी - भारत गणराज्य दिवस
३. १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)
४. ६ जुन, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हिंदु स्वराज्य दिन
५. ११ मार्च, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)
६. २८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
७. १४ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
८. २६ जुलै, कारगिल विजय दिन
९. २३ मार्च, शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु हुतात्मा दिन
(ह्या दिवसांच महत्व जर माहीत नसेल तर जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवुन ते स्वत:च शोधावे आणि आपल्यासारख्या बाकीच्यांनाही ते सांगावे.)
References:
http://www.coolquiz.com/trivia/explain/docs/valentine.asp
http://en.wikipedia.org/wiki/Saint_Valentine
http://en.wikipedia.org/wiki/Valentines_day
http://www.pictureframes.co.uk/Saint-Valentine.aspx