पुरस्कार
परत करतोय पुरस्कार माझा
पहा आता तरी माझ्याकडे सगळ्यांनी जरा
मिळाला होता जेव्हा मला, कळाले होते का कुणाला?
एवढे दिवस होते देशात सगळे छान
नांदत होती शांतता, प्रेम आणि बंधुता सगळीकडे
पहात होतो मी साखरझोपेतून तिकडे
अचानक झाला बदल त्यात
बदलले सगळे राजकारण आज
पुरस्कार मिळाला ज्यांच्यामुळे मला
बघवत नाहीत आता त्यांचेच हाल
काय करू कळत नव्हते
रस्त्यावर उतरून उपोषण करणे
हे तर आपले काम नव्हते
लेखनीला आपल्या एकच कळते
मिळाला पैसा तरच तिपण चालते
पुरस्कार मात्र नुसतेच पडून होते
पहायला कोणी कुत्र्ये पण नव्हते
म्हणून म्हटले परत करावे
कधीनव्हे तर टीव्ही वर नावपण झळकतेय
सहिष्णुतेच्या बाता मारल्या
असहिष्णुतेचा आव आणला
मुलाखतींच्या फैरी झाडल्या
सरकारच्या नावाने पण बोम्बा हाणल्या
लोकांच्याही मग त्यावर प्रतिक्रिया आल्या...
आतातरी मिळेल काहो शांततेचा नोबेल पुरस्कार मला?
नरेंद्र भोंगाळे
पहा आता तरी माझ्याकडे सगळ्यांनी जरा
मिळाला होता जेव्हा मला, कळाले होते का कुणाला?
एवढे दिवस होते देशात सगळे छान
नांदत होती शांतता, प्रेम आणि बंधुता सगळीकडे
पहात होतो मी साखरझोपेतून तिकडे
अचानक झाला बदल त्यात
बदलले सगळे राजकारण आज
पुरस्कार मिळाला ज्यांच्यामुळे मला
बघवत नाहीत आता त्यांचेच हाल
काय करू कळत नव्हते
रस्त्यावर उतरून उपोषण करणे
हे तर आपले काम नव्हते
लेखनीला आपल्या एकच कळते
मिळाला पैसा तरच तिपण चालते
पुरस्कार मात्र नुसतेच पडून होते
पहायला कोणी कुत्र्ये पण नव्हते
म्हणून म्हटले परत करावे
कधीनव्हे तर टीव्ही वर नावपण झळकतेय
सहिष्णुतेच्या बाता मारल्या
असहिष्णुतेचा आव आणला
मुलाखतींच्या फैरी झाडल्या
सरकारच्या नावाने पण बोम्बा हाणल्या
लोकांच्याही मग त्यावर प्रतिक्रिया आल्या...
आतातरी मिळेल काहो शांततेचा नोबेल पुरस्कार मला?
नरेंद्र भोंगाळे
No comments:
Post a Comment