Saturday, February 13, 2010

खान बघुन झाला की या पुण्याला जेवायला !!!

                                                  

पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्स्फोट झाला...

आतली खबर अशी आहे की, भारत पाकिस्तानचे मैत्रिचे संबंध आहेत ( हे कॉंग्रेस शिवाय कोणालाच माहीत नाही, पाकिस्तान व दहशतवाद्यांना सुद्धा!! ).

शारुख खान, ज्याला त्या पकिस्तानचा पुळका येतो आणि तो काहिही बोलुन जातो, वर देशाची माफी सुद्धा मागत नाही. अशा देशद्रोही मानसाचा विरोध करावा असे एकाच राजकीय पक्षाला वाटते. आणि एवढ करुण पुन्हा हि गाढव जनता त्यांचच माप काढते. राहुल गांधी, महाराष्ट्राबद्दल मनात येयिल ते बोलतो. त्याचा विरोध करावा असे सुद्धा एकाच राजकीय पक्षाला वाटते. आणि एवढ करुण पुन्हा हि गाढव जनता त्यांचच माप काढते.

शिवसेनेने राहुल गांधिला विरोध केला, तरी तो आला आणी गेला. पण तो सुखरुप रहावा म्हणुन कॉंग्रेसने आधिच हजारो शिवसैनिकांना तुरुंगात टाकले. तरीही हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरुण त्याला काळे झेंडे दाखवत होते (एके ४७ समोर आजुन काय करवे त्यांनी?). रेल्वे स्टेशनबाहेर पोलिसांनी लाठिचार्ज करून शिवसैनिकांना मारले. काळे झेंडे अहिंसाचा मार्ग ना, गांधिजी तेच करायचे ना? मग शिवसैनिकांवर लाठीचार्ज कशाला करायचा. आणि जी गाढवं घरात बसुन शिवसेनेची माप काढतात की शिवसेनेत दम नाही, त्यांनी स्वत: कधी पोलिसांची एखादी लाठी खाल्ली आहे का? कधी राष्ट्राकरता ते एअरकंडिशनच आयुष्य सोडुन रस्त्यावर उतरले आहेत का? कधी एके ४७ समोर उभ राहुन अन्यायाचा विरोध केला आहे का? कधी राष्ट्राकरता जेलमध्ये गेले आहेत का? एवढ सोडा, साद मत कोणाला टाकाव याचीतरी अक्कल आहे का? महाराष्ट्रात गाढवांची संख्या जास्त झाली आहे आणि म्हणुन तर त्यांना हाकायला गाढव सरकार ते निवडुन आणतायत. आणी प्रत्येक गाढवाने "मला काय त्याचे" म्हनायच, आणी आराम करायचा. अरे हे काय फक्त शिवसैनिकांच काम होत का? मिडिया म्हनजे तर ह्या अशा गाढवांच घर. बघाव तेव्हा, बघाव तस हि मिडीयाची गाढव ओरडतात, आणि वर त्यांचा तो गाढवी अश्लिलपना सगळ्यांसमोर टिव्हीवर चालुच असतो.

बर आता हा खान पाकिस्तानचा पुळका घेतो म्हनुन त्याला विरोध पण शिवसेनेने करायचा. आता शिवसेना एक काम करतेयना, तर राजने कराव ना त्याला वाटतय तर अमिताभचा विरोध. आणी आमच्या गाढवांना काय कळतय. फुकटच शिवसेनेच्या नावाने पुन्हा ओरडायला तयार. आणी ह्यांचा मालक ह्यांना देशद्रोही विधाने करणार्या खान चा सिनेमा फुकट दाखवतो. चालले हे बघायला. "मला काय त्याचे’ म्हणुन हे पण देशद्रोह्याला पैसे मिळवुन द्यायला सामिल झाले.

ह्या सगळ्यांचा शिवसेनेने कडवा विरोध केला. कितीतरी हजार पोलिस सरकारने कामाला लावले. ह्या फालतु गाढव कामाचा पगार ह्यांचा (सरकारचा) बाप देनार का? पोलिसांनाही ह्या गाढवांच्या सरकारने गाढव कामाला जुंपले व त्यांचही गाढव करुन टाकल. शेवटी गाढवांच्या मालकांकडुन अपेक्षा ती काय करावी? हजारो पोलिस धाक्याला लावले ते खान वाचवायला. एवढच काय तर हे स्वत: जावुन बसले खान पहायला व त्याला सुरक्षा द्यायला. वा.. किती छान....!!!

अहो आता मझ्या घारातच बॉम्बस्फोट झालाय हो ... माझ्या पुण्यात ... मला पण सुरक्षतेची गरज आहे... त्यामुळे तुमचा खान पहुन व वाचवुन झाला असेल तर माझ्या पुण्याला या... आणि जसे खान वाचवायला स्वत: जातीने गेलात तसेच आमच्याकडेही जर्मन बेकरीत जेवायला या व आम्हाला वाचवायला या.... आम्ही पुणेकर खुप सेवा करतो अतिथिंची ( जरी तो अतिथी गाढव असेल तरी, अतिथी देवो भव!), तुमचा जेवनाचा खर्च आम्ही करु....
(जेवनाचे पहिले आमंत्रण माझा मित्र शिरीष याच्याकडुन)

स्वत:चे सर्व काम बाजुला ठेवुन, स्वत:च्या प्राणांचिही पर्वा न करता, ज्या सर्वांनी देह्द्रोहाचा विरोध केला त्या सर्वांचे मन:पुर्वक आभार व धन्यवाद.

(अधिक माहिती करता बाळासाहेबांचा लेख चिटकवला आहे)

जय हिंद, जय महाराष्ट्र....
नरेंद्र

(माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पण महाराष्ट्र व भारताशी आहे)
(कोणत्या गाढवाच्या जर ह्या लेखाने भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याची मी माफी मागतो, त्यांनाही भावना असतात हे मान्य!)

Thursday, February 11, 2010

व्हेलेण्टाईन डॆ आपण साजरा करायचा?

व्हेलेण्टाईन डॆ चा इतिहास अगोदर माहीत आहे का? तो आपण थोडक्यात पाहु.

तिसरया शतकात, रोमच्या राजाने (Roman Emperor Claudius II) सैनिकांना लग्न करायला बंदी केली. कारण त्याचं सैन्य त्यामुळे शक्तिशाली राहील अस त्याला वाटायचं. "व्हेलेण्टाईन" नावाचा ख्रिश्चन धर्मोपदेशक त्या सैनिकांची गुपचुप लग्न लावायचा. राजाने त्याला जेलमधे टाकलं. धर्मांतर केलंस तर जिवंत राहशील नाहितर तुला मारलं जाईल, अस त्याला सांगितल गेलं. पण त्याने धर्मांतर करायला नकार दिला.

अस मानतात की व्हेलेण्टाईनने जेलरच्या आंधळ्या मुलीला बरं केलं आणि मरायच्या आधी त्याने तिला पत्र लिहिलं आणि पत्राच्या शेवटी, "तुझा व्हेलेण्टाईन" ("From your Valentine") अशी सही केली. इतिहासात कुठेच असा पुरावा नाही की त्यांच खरं प्रेम होतं.

त्याला १४ फेब्रुवारी २६९ इ.स. ला मारण्यात आलं. धर्माकरता त्याने स्वत:चा जीव दिला. इ.स. ४९६ ला मुख्य ख्रिश्चन धर्मगुरु जेलासिअस (Pope Gelasius) ने, व्हेलेण्टाईनच्या आठवणीत हा दिवस साजरा करायचं ठरवलं. आज हाच दिवस प्रेमाचा दिवस म्हणुन साजरा होतो!

भारतीयांचा ह्याच्याशी काडीचाही संबंध दिसत नाही. पण आता ह्या दिवसाला प्रेमाचा दिवस म्हणुन वलय निर्माण झालंय अथवा केलं गेलंय आणि प्रेमाशी तर सगळ्यांचाच संबंध येतो!

जर साजरा करायचा असेल तर, हा दिवस का व कशासाठी साजरा करायचा ते आधी समजुन घ्या. खरच काही प्रेमाचा इतिहास आहे का? का उगाच दुसरा करतोय म्हणुन आपण पण तेच करायचं? काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. पण आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा.

व्हेलेण्टाईन डे आपण जर साजरा करतो तर ज्यांचा आपल्या देशाशी संबंध आहे, आपल्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, ज्यांचा आपल्या असण्याशीच संबंध आहे, ज्यांच्यामुळे आज आपण सुखाने, ताठ मानेने जगु शकतोय, त्यांचे दिवसही आपण न विसरता साजरे करतो का? असे दिवस तरी माहीत आहेत का?  त्या दिवसांच महत्व हे व्हेलेण्टाईन डे पेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. असे दिवस प्रत्येकाने न विसरता साजरे करावेत.

काही मह्त्वाचे दिवस -

१. १५ ऑगस्ट - भारत स्वतंत्रता दिवस
२. २६ जानेवारी - भारत गणराज्य दिवस
३. १९  फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)
४. ६ जुन, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हिंदु स्वराज्य दिन
५. ११ मार्च, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)
६. २८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
७. १४ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
८. २६ जुलै, कारगिल विजय दिन
९. २३ मार्च, शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु हुतात्मा दिन

(ह्या दिवसांच महत्व जर माहीत नसेल तर जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवुन ते स्वत:च शोधावे आणि आपल्यासारख्या बाकीच्यांनाही ते सांगावे.)

References:

http://www.coolquiz.com/trivia/explain/docs/valentine.asp
http://en.wikipedia.org/wiki/Saint_Valentine
http://en.wikipedia.org/wiki/Valentines_day
http://www.pictureframes.co.uk/Saint-Valentine.aspx