(सत्य घटनेवर आधारित)
"ठाण" शत्रूच्या तलवारीचा वार तलवारीवरच घेतला. दोन पाती एकमेकांनवर विजेच्या वेगाने आदळली. लगेच मी परतीचा वार केला आणि सापकन एकाच मुंडक उडवल. जोरात ललकारी फोडली - "हर हर महादेव", आणि पुन्हा गनिमांवर तुटून पडलो. तानाजीराव आवेशाने लढत होते. समोर येणारा प्रत्येक गनिम तालवारीच्या एकाच वाराने कापुन काढत होते. "आज माग हटायच नाय, गड घेतल्याबिगर राजास्नी तोंड दाखवायच नाय", तानाजीराव मधेच ओरडले आणि पुन्हा गनिमावर तुटुन पडले. सगळे मावळे आजुनच आवेशने लढु लागले. मला एकाच वेळी चार गनिमांनी घेरल होत. मी रपारप तलवारीच पात फिरवत होतो. पायाखाली मढ्यांचा आणि रक्ताचा चिखल झाला होता. तेवढ्यात कोणीतरी सपकन पाठीवर वार केला. त्या एकाच वाराने पाठीच चामड कापुन पाठीचे दोन भाग केले. आ... मी वेद्नेने जोरात ओरडलो.
आता मी झोपेतून खाडकन जागा झालो होतो.
सगळ अंग घामाने ओल झाल होत. ह्रुदयाची ती जोरात होणारी धडधड स्पष्ट ऐकू येत होती. भिंतीवर लटकलेल्या घड्याळात सकाळचे सहा वाजले होते. सकाळची स्वप्न खरी होतात हा विचार मनात डोकावुन गेला आणि कसतरीच वाटल.
आज शनिवार, ऑफिसला सुटिटी. कॉप्युटर क्षेत्रात काम केल्याचा हाच फायदा असतो. शनिवार, रविवार मस्त सुटिट मिळते. लगेच ठरवल, आज सिंहगडला जायच. जन्म पुण्यातला,लहानाचा मोठ्ठा पुण्यात झालो, पण आजपर्यंत सिंहगड पहायचा योग नव्हता आला. आणि तस पहायच झाल तर शिवजी महाराज आणि माझा संबंध चवथीच्या पुस्तकात गाळलेल्या जागा भरण्याशिवाय इतरत्र आला नव्हता. पण मी आता ठरवल होत, महाराजांविषयी सगळ जाणून घ्यायच.त्याकरता मी बाबासाहेब पुरंदरेंनी लिहीलेल "राजा शिवछ्त्रपती" हे पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. त्यामुळेच मला रात्री अशी स्वप्न पडायला लगली होती.
शिरीषला फोन लावला. "आल इज वेल" गान वाजत होत.
"काय रे आज सकाळसकाळी कशी आठवण आली?" त्याने विचारल.
"सिंहगडला जावुयात, येतोस का?" मी उत्तर दिल.
"तुला काय वेड लागलय का? काय ठेवलय तिकड? बायकोला आज "थ्री इडीयट" दाखवायच प्रोमिस केलय.येतोस क तु पण?" त्याने विचारल.
"नको रे, जा तु, चल बाय", आणि मी फोन ठेवून दिला.
कोणीही सोबत नाही आल तरी एकट जायच ठरवल.
घरातुन निघायला आठ वाजले. सोबत राजा शिवछत्रपती हे पुस्तक पण घेतल.
गाडीला किक मारली आणि निघालो.
सिंहगड आता नजरेच्या टप्प्यात आला होता. रस्ता खुपच अवघड होता. गड जसाजसा जवळ येत होता तसा मी जास्तच इतिहासात हरवु लागलो. महाराज त्या काळी कुठुन व कसे जात असतील? असे बरेच प्रश्न मनात येवु लागले.जाताना रस्त्यात मोटारसायकली लागलेल्या दिसल्या. कपल्स हातात हात घालुन झाडाझुडुपात बसलेले दिसत होते.
एकदाचा मी गडावर पोहोचलो. गाडी लावायलाही जागा नव्ह्ती, इतकी गर्दी होती. मी तानाजीरावांची समाधी शोधली. समाधीच्या पाया पडलो. एका शाळेची सहल आली होती. शिक्षक मुलांना महाराज, तानाजीराव मालुसरे, सिंहगड विषयी सांगत होते. समाधीमागे एक कुटुंब मुलांबरोबर क्रिकेट खेळत होत. मी गडावर इकडेतिकडे फिरलो आणि एका बुरुजाजवळ बसलो आणि राजा शिवछत्रपती वाचायला सुरुवात केली.
मी पुर्णपणे इतिहासात गुंग झालो होतो. ते सर्व मला डोळ्यांसमोर दिसायला लागल. तानाजीराव व त्यांच्या सोबतच्या मुठभर मावळ्यांनी रात्रिच्या अंधारात ह्या भयानक वाटेवरुन वर चढुन, शत्रुची नरडी फोडुन गड जिंकला. हे वाचुन अंगावर काटा आला. तानाजीरावांनी स्वराज्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली.
एथे एथेच हे सर्व घडल्यासारख वाटत होत. माझ रक्त उसाळुन आल, मन पेटुन उठल. मी पुस्तक बंद करुन आजुबाजुला पाहिल. जवळच एक जोडप दिसल. त्यांचे त्या बुरुजाच्या अडोश्याला अश्लिल चाळे चालु होते. एका बाजुला ट्रेकिंग, गिर्यारोहक गड सर केल्याचा जल्लोष करत होते. निसर्ग प्रेमी सुर्यास्ताचा आनंद लुटत गप्पा मारत होते. मी घरी जायला निघालो. काही जण पिठल भाकरी, कांदा भजी खात बसलेले. काही कळत नव्हत, पण मन अशांत वाटत होत. मी घरी आलो आणी घराच्या छ्तावर गेलो. अंधार पडत होता, पण गड निट दिसत होता.
मी एकटक गडाकडे पहात होतो. मध्येच वीज चमकली आणि साक्षात गड माझ्या समोर उभा राहिला. गडावर साक्षात महाराज उभे असलेले दिसत होते. गड माझ्याशी बोलु लागला.
आज तु महाराजांचा इतिहास जाणुन घ्यायला आलास, खुप बरा वाटल. आजुन किती दिवस मी जगेल ते महीत नाही. माझे बुरुज ढासळु लागलेत. जगण्याची इच्छाच संपलिये. गडांचा गड, राजांचा गड हताश होवुन बोलत होता. आजच्याच भाषेत सांगतो तुला.
का जगु? महाराजांचा, त्यांच्या आदर्शांचा, जिवनभराच्या तपाचा, लाडक्या गडांचा हा अपमान आता बघवत नाही. गडावर प्रत्येक ठिकाणी जोडपी, डुकरांनाही लाजवेल अशा अवस्थेत, अशा प्रकारे अश्लिल चाळे करत बसलेली असतात. आजची हि तरुण पिढी. महाराजांनी कधी गडावर स्वत:च नाव लिहील नाही. तिथे हे लोकशाही सरकारच्या नावखाली राजकारणी लोक स्वत:च्या नावाचे फलक लावतात. प्रेमवीर जागोजागी स्वत:च्या प्रेमाचे पुरावे कोरुन ठेवतात. लोक येतात ते एकडे मजा मारायला. सुटिट्चा दिवस एन्जोय करायला. भजी, पिठलभाकरी खायला. सनसेटचा आनंद लुटायला. जीम, फिटनेस वाढवायला गडावर ट्रिप्स काढतात. ट्रेकिंग करण्याचा, सनसेट पहाण्याचा, सहली काढण्याचा, फॅमलीबरोबर सुटिट एन्जोय करण्याचा प्रसिद्ध अड्डा, पिकनिक स्पॉट बनलोय मी. किती आणि काय काय सांगु?
जिथ मावळ्यांनी आणि तानाजीरावांनी स्वराज्य, स्वधर्म, याकरता प्राणांची बाजी लावली, स्वत:च रक्त सांडल, आज तिथेच ही आजची पिढि दारु पिते, सिगारेट फुकते, क्यांपफायर करते. जिथे ह्यांच्यासाठी काही काळापुर्वि रक्त सांडल तिथे हे दारु सांडुन परतफेड करताहेत. जिथे हर हर महादेवच्या घोषणा ऎकु यायच्या तिकडेच आजचे हे पर्यटक मोठमोठयांनी गाणी आळवतात. जिथे स्वराज्यासाठी प्राणांची पर्वा न करता मावळे हातात नंग्या तलवारी घेवुन लढले, तिकडेच दारुच्या बेधुंद नशेत निर्लज्जासारखे झिंगत ही तरुण पिढी डान्स करते.
"बास करा" महाराज म्हणाले. साक्षात महाराज बोलु लागले.
हा समाज, हि हिंदु पिढि, तरुण, तरुणी निर्लज्ज झालेत. षंढ झालेत. आम्ही उभ करुण दिलेल स्वराज्य ह्यांना साध संभाळता, टिकवताहि येत नाही. अरे शिवतिर्थांकडुन स्वराज्याची, राष्ट्रभक्तिची, स्वातंत्र्याची, स्वधर्माची प्रेरणा घ्यायची तर त्यांचीच आज तुम्ही अवहेलना करता आहात. सगळ विसरुण मौज मजा करताहात. आम्हाला पुन्हा जन्माला या म्हनता. का? हे सगळ पहायला? हा सगळा समाज किती निर्लज्ज आणि षंढ झालाय ते पहायला?
महाराज एवढ बोलुन थांबले.
मी राजांना म्हटल, मला क्षमा करा. आजपर्यंत सगळ विसरुन फक्त मैज मजा मारत जगत होतो. माझही पुढच्या पिढी करता काही कर्तव्य आहे हे विसरुन गेलो होतो. ह्या शिवतिर्थांच रक्षण करण, त्यांना पुढच्या पिढिच्या हाती दारुचे अड्डे म्हणुन नाही तर शिवतिर्थ म्हणुन सोपवण्याकरता मी निरंतर कार्य करेल. स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य, स्वराष्ट्र, स्वातंत्र्य यांच्या रक्षणाकरता प्राणांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत लढेल.
मी महाराजांना मुजरा केला.
आई भवानी तुम्हास यश देवो, महाराजांनी आशिर्वाद दिला.
महाराज आणि गड दोन्हीही अंधारात दिसेनासे झाले. पण जाण्याआधी बरच काही शिकवुन गेले.
......
आभिनव निर्माण प्रतिष्ठाणला हि कथा अर्पण: http://www.abhinavnirmaan.com/
वा. रे मर्दा... :) असाच काहीसे माझे झाले होते बरेच वर्षांपूर्वी ...
ReplyDeleteत्या नंतर मी नव्याने सुरवात केली. माझे 'सिंहगड'वरील लिखाण येथे आहे. नक्की वाच.
http://mazisahyabhramanti.blogspot.com/2009/05/blog-post_14.html
NIce inspiring story.
ReplyDelete